Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.
     
Limit search to available items
Results Page:  Previous Next
Author Manaswini.

Title अनुभुति [OverDrive/Libby electronic resource] एक आगळा कविता संग्रह. Manaswini.

Imprint Pacific Grove : Smashwords Edition, 2015.
QR Code
Description 1 online resource
Note Title from eBook information screen..
Summary हलकं-फुलकं मनोरंजन करणाऱ्या, तरीही ज्ञानवर्धक अशा ह्या कविता वाचकाला आगळी अनुभूति देतात. अनुभूति हा मनासविनीचा पहिली मराठी कविता संग्रह असून, रोजच्या जीवनातील विविध विषयांवरी १२०+ कविता तिने सादर केल्या आहेत. अनुभुति कविता संग्रहातील कविता विविध विभागांमध्ये वर्गीकृत केल्या आहेत - निरिक्षण, भावना, सद्यस्थिती, सत्य, बोध (समज), चेतावणी (सावधानता), व्यंगचित्र इत्यादी. प्रत्येक कविता तुमच्या आयुष्याशी निगडित वाटतील. काही मनाला तर काही हृदयाला किंवा दोन्हीला भिडतील! काही कविता विनोदी, काही कथन केल्यासारख्या तर काही शब्दांवर खेळ केलेल्या आहेत. या सर्वच कविता तुमच्या मनावर, खोलवर ठसा उमटवून तुमच्या आत्म्याला भिडतील. यातून मनस्विनीचे भाषेवरील प्रभुत्व जाणवते, जे हृदयाला भिडणारा संदेश देते. या कविता जसजशा वाचत पुढे जाल तसतसे तिचे मन, भावना आणि काय चांगलं काय वाईट याबद्दलच्या तिच्या कल्पना तुम्ही जाणाल. आत-बाहेर, आड-उड न ठेवता थेट आणि स्पष्टपणे लिहिण्याची तिची पद्धत आहे. 'का' आणि 'कसे' असे प्रश्न ती स्वतःलाच विचारते तर कधी कधी आपले 'निरीक्षण' वाचकापुढे ठेवते आणि निर्णय त्याच्यावर सोपवतो. ती खूप बडबडी आहे आणि समाजातील गोष्टी ज्या भूतकाळात किंवा वर्तमान काळात आहेत त्या सांगते आणि जग कोणत्या मार्गाने पुढे जात आहे याचा विचार करायला भाग पाडते, ज्यामुळे तुमच्या भावना ढवळून निघून तुम्ही आश्चर्यचकित होता. अनभिज्ञ बालिकेच्या मनातील विचार, एक अजाण मुलगा त्याच्या आईला विचारात असलेला प्रश्न, सर्वात प्रिय आणि विश्वासार्ह व्यक्तीने केलेली फसवणूक, अवाजवी सामाजिक बंधने, गरिबी आणि श्रीमंती, खोटे मुखवटे घालून, चेहरा लपवून वागणाऱ्या माणसांना उघडं पाडते.भोवतालच्या पर्यावरणाच्या संवर्धनाची तिला जाण आहे. जसजसा नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होतोय तसतसा मानवी बुद्धीचा ऱ्हास होत असल्याची हळहळ तिला वाटते. मानसिक कोतेपणाची खंत तिला वाटते. विविध परिस्थितीत, विविध मनाच्या अवस्था मनोरंजक पद्धतीने अगदी सहज साधे हसण्यापासून ते प्रदीर्घ ठसा उमटविण्यापर्यंत प्रत्येक वाचकाला आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते. प्रत्यक्ष वाचकाच्या मनात निदान एखाद दोन कवितांचा वास कायम राहील ह्याची हमी मनस्विनी देते. हल्लीच्या दुनियेत सातत्याने होणारे बदल, बदलती भाषा , शब्दांचे बदलते अर्थ आणि त्यानुसार करावे लागणारी तडजोड आणि त्यामुळे येणारा जीवन शैलीतील बदल हे नुतून जीवन पद्धतीत अपरिहार्य झालं आहे. ह्यातून निर्माण होणारे पेच प्रसंग, तडजोडी आणि त्यावर काढलेले उपाय मनस्विनीच्या डोक्यात सतत घोळतात आणि त्यातूनच होणारी 'अनुभुति' जाणवते. अशा बदलत्या परिस्थितीत आपलं खरं अंतर्मन सतत 'काय चूक, काय बरोबर' ह्या द्विधा अवस्थेत राहून 'काय कमावलं', काय गमावलं' याच सतत आढावा घेत असतं त्यामुळे देव, अधिदैविक, नशीब, प्रारब्ध आणि अंधश्रद्धा सोडून सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यास प्रवृत्त करतात. हा मानसिक प्रवास म्हणजेच मनस्विनीची 'अनुभूति' आहे. वाचक एका मागून एक कविता वाचत जाईल - प्रत्येक व्यक्तीला अविस्मरणीय प्रसंगातून जावेच लागते तेव्हा तेव्हा त्याला मानवी क्षमतेची जाणीव होते आणि त्याचा तोरा उतरतो. ह्या व इतर बारीक-सारीक गोष्टी मनस्विनीने सहज जाता जाता छेडल्या आहेत. रसिकांनो प्रत्येक कविता लक्ष्य पूर्वक वाचलीत आणि आस्वाद घेत गेलात तर त्यांतील विविध भावनांची उकल होईल आणि तुम्ही मनस्विनी चे अंतर्मन ओळखत जाल. ह्या कवितांचे वाचन, मनं, पचन हीच अनुभुति आहे. चला तर, मनस्विनी बरोबरचा प्रवास आरंभ करा...
System Details Requires OverDrive Read (file size: N/A KB) or Adobe Digital Editions (file size: 1874 KB) or Kobo app or compatible Kobo device (file size: N/A KB).
Subject Fiction.
Poetry.
Genre Electronic books.
ISBN 9781311382672 (electronic bk)
Patron reviews: add a review
Click for more information
EBOOK
No one has rated this material

You can...
Also...
- Find similar reads
- Add a review
- Sign-up for Newsletter
- Suggest a purchase
- Can't find what you want?
More Information