Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.
     
Results Page:  Previous Next
Author CHINCHOLIKAR, VIKRAM.

Title गैरसमज [OverDrive/Libby electronic resource] एक मार्गदर्शक आत्मा, एक वाघाचे भूत आणि एक भितीदायक आई!. VIKRAM CHINCHOLIKAR.

Imprint Csorna : Tektime, 2021.
QR Code
Description 1 online resource
Note Title from eBook information screen..
Summary मेगन एक अतिमानसी किशोरवयीन मुलगी आहे, जिला स्वतःचे सामर्थ्य समजावून घेण्यास, मदतीस कोणी सापडत नाही आहे... अर्थात एका निर्जन ठिकाणी. 'गैरसमझ' ही एका लहान मुलीची, कुटुंबातील कोणीही करू शकत नाही अशा गोष्टी करण्यास सक्षम असण्याची तिच्या वाढत्या जाणीवेविषयी एक लहान कथा आहे, ज्यावर तिच्या शाळेतील काही मित्र म्हणतात की त्यांच्यात अशाच असामान्य मानसिक क्षमता आहेत. या मुलीचे नाव मेगन आहे आणि ती या पहिल्या पुस्तकात बारा वर्षांची आहे. मेगनला दोन अटळ समस्या असल्याचे दिसते. पहिली गोष्ट म्हणजे तिची आई तिच्या मुलीच्या सुप्त क्षमता पाहून घाबरलेली आहे आणि केवळ येवढंच नव्हे तर तिला मदत करत नसून तिला सक्रियपणे निराश करत आहे आणि दुसरी म्हणजे तिला तिच्या अलौकिक, मानसिक शक्ती विकसित करण्यास मदत करणारा शिक्षक सापडत नाही. ती तिच्या आईशी या गोष्टींबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला अगदीच लहान प्रतिसाद मिळतो आणि ती ही बाब तिच्या वडिलांना सांगणे योग्य समजत नाही कारण तिला माहित आहे की तिची आई हे मंजूर करणार नाही आणि शिवाय मेगनला तिच्या आईच्या मर्जीत रहायचे आहे. मेगनला वाटतं की त्या दोघींमध्ये एक मूक करार आहे. कदाचित हा करार सर्व आई आणि त्यांच्या मुलींमध्ये अस्तित्वात असतो, परंतु इथे हा कदाचित अधिक खोलवर जातो. कोण सांगू शकेल, कारण मेगन स्वतःला देखील ओळखत नाही? तिला एवढेच माहिती आहे की आपली आई, आपल्या चिंतांबद्दल आपला विश्वास असणाऱ्या एखाद्याशी चर्चा करू इच्छित असणाऱ्या, लवकरच किशोरवयीन होणार असलेल्या आपल्या मुलीची प्रेमळ आई म्हणून अपेक्षित भूमिका बजावताना दिसत नाही. मेगन तिच्या आईला आपल्या अलौकिकतेच्या भीतीपासून उभरण्यासाठी वेळ देऊ इच्छित आहे. ती प्रतीक्षा करू शकते आणि वडिलांच्या नकळत तिच्यावर गुप्तपणे लादल्या गेलेले भयानक अत्याचार ती सहन करू शकते. निदान, ती आत्तापुरते तरी करू शकते. 'गैरसमज' ही, मेगनला तिच्या अलौकिक, अध्यात्मिक आणि मानसिक विकासासह कसे पुढे जाणे शक्य आहे हे समजण्यास मदत करणारे लोक सापडल्याने तिच्या निरंतर प्रबोधनाबद्दल या मालिकेतील आतापर्यंतच्या तेवीस लघु कथांपैकी पहिली लघु कथा आहे. कारण तिला केवळ काय करणे शक्य आहे आणि ते कसे करावे हे नाही तर तिने तिच्या विशेष क्षमता कशात गुंतवाव्या हे शिकवले जाणे आवश्यक आहे. मेगन एक चांगली मुलगी आहे, म्हणूनच आपल्या शक्ती चांगल्या हेतूंसाठी वापरण्याकडे तिचा कल असणे साहजिक आहे, परंतु योग्य काय आहे ते ज्ञात असले तरी त्यावर नेहमीच अंमल करणे शक्य नसते. मेगनबद्दलच्या या कथा, मानसिक शक्तींमध्ये, अलौकिक आणि अलौकिक गोष्टींमध्ये रस असणाऱ्या आणि दहा ते शंभर वर्षे वयोगटातील कोणासही आकर्षित करतील.
System Details Requires OverDrive Read (file size: N/A KB) or Adobe Digital Editions (file size: 453 KB).
Subject Fiction.
Fantasy.
Literature.
Genre Electronic books.
ISBN 9788835416869 (electronic bk)
Patron reviews: add a review
Click for more information
EBOOK
No one has rated this material

You can...
Also...
- Find similar reads
- Add a review
- Sign-up for Newsletter
- Suggest a purchase
- Can't find what you want?
More Information